पुणे : २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भापचने १६४ पैकी ९९ जागा मिळवून पुणे महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला होता. परंतू, गेल्या चार वर्षाच्या कामगिरीवर पुणेकरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात जगताप बोलत होते. २०१७ ला पुणे इतर महापालिकांबरोबरच पुणे महापालिकेची निवडणूक झाली. त्यामध्ये एकूण १६४ नगरसेवकांचं संख्याबळ आहे. त्यापैकी भाजपकडे सर्वाधिक ९९ नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी ४४, काँग्रेस ९ आणि शिवसेनेकडे ९ जागांचं बळ आहे. त्यामुळे, पुणे महापालिकेत सध्या भाजप सत्तेत आहे.
मात्र सद्यस्थितीला सत्ताधारी भाजपच्या कामावरती पुणेकरांमध्ये असंतोष असल्याचे चित्र आहे. पुणेकर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवतील. अजित पवारांच्या नेतृत्वात महापालिका जिंकू असा विश्वास शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवेसना नेते संजय राऊत यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पुणे दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं होतं. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली . शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. तर, काँग्रेसला सोबत घेण्याचा विचार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
Read also :
- “शिवसेना हा विश्वासू पक्ष”- शरद पवार
- मोदी सरकार लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न करतंय; अजित पवार संतापले
- जातप्रणात पत्र ठरले अवैध: नवनीत राणा यांची खासदारकी जाण्याची कितीपत शक्यता?
- वाघाशी दोस्ती करणार?; चंद्रकांत पाटलांची इच्छा पुर्ण होवो.. संजय राऊतांच्या शुभेच्छा
- ‘राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव’