– पिंपरी-चिंचवडमधील रस्ते भूमिपुजनावर शुंभूप्रेमींची टीका
पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका पडद्यावर साकारून राजकीय आणि अभिनय क्षेत्रात नाव कमावणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या आश्वसानंची जाण ठेवावी. छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ असलेल्या तुळापूर गावात पायाभूत सोयी-सुविधांचा वाणवा आहे. त्याकडे लक्ष घालावे, अशी टीका तुळापूरचे माजी उपसरपंच अमोल शिवले यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँकेच्या चौकशीला हायकोर्टाचा हिरवा कंदील
शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत विविध रस्त्यांचे ४ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐतिहासिक वढू व तुळापूर गावातील पायाभूत सुविधा आणि छत्रपती संभाजी महाराज व कवि कलश यांच्या समाधिस्थळ परिसरातील सुविधा सक्षम करण्याबाबत दिलेले आश्वासन सोयीस्करपणे विसरले. निवडणुकीत राजकीय फायदा उचलणाऱ्या डॉ. कोल्हे यांनी वढू आणि तुळापूरच्या रस्त्यांकडे लक्ष घातले असते, तर महाराष्ट्रातील शिव-शंभूप्रेमींकडून स्वागत झाले असते, अशा संतत्प प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून येत आहेत.
देगलूर – बिलोली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच दणदणीत विजय मिळवेल; बाळासाहेब थोरातांचा दावा
तळापुरचे माजी उपसरपंच अमोल शिवले म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावाने डॉ. कोल्हे यांनी मालिका सुरू केली. राजांचा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवला. याबद्दल त्यांचे कौतक आहे. पण, डॉ. कोल्हे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर वढू-तुळापूरबाबत असलेली बांधिलकी विसरले आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या रस्त्यांचे श्रेय खासदार कोल्हे घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुळापूर येथील ४५ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. आळंदी- मरकळ रोड खड्डेमय झाला आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिक- वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वाघोली ते तुळापूरला जोडणारा रस्ता अत्यंत दयनीय झाला आहे. याकडे खासदार अमोल कोल्हे दुर्लक्ष करीत आहेत.
शिरुर मतदार संघातील ग्रामीण भागाकडे कोल्हेंचे दुर्लक्ष…
लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी मतदार संघातील महापालिका, नगरपालिकांमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, ग्रामीण भागाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळाकडे म्हणजेच श्री क्षेत्र तुळापूर गावामध्ये पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. मात्र, खासदार कोल्हे यांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक खुणावत आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांना तशी जबाबदारीच दिली असावी. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या सभेमध्ये ’१० चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याचा’एल्गार कोल्हे यांनी केला. त्याच्या काही दिवसांतच ४ कोटी रुपयांची किरकोळ कामे जी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा स्तरीय समितीच्या माध्यमातून झाली आहे. त्यांना ‘विषेष प्रयत्नातून’असे श्रेय लाटण्याचा प्रयत्न खासदार कोल्हे यांनी केला. या बाबीचा जिल्ह्यातील शंभूप्रेमींकडून निषेध होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मतांवर डोळा…
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ५ हजार कोटींचा आहे. आतापर्यंत महापालिका प्रशासनाकडून २०१७ पासून सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत, असे आकडेवारी सांगते. पण, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अचानक जाग आली. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदार संघात ४ कोटी रुपयांचा रस्त्यांवर खर्च केला. वास्तविक, पिंपरी-चिंचवड सारख्या शहरी भागात रस्त्यांवर खर्च करण्यापेक्षा कोल्हे यांनी वढू-तुळापूर गावांतील पायाभूत समस्या सोडवण्याबाबत पुढकार घेणे अपेक्षीत होते. ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी याबाबत पाठपुरावाही केला आहे. मात्र, मतांचे राजकारण करीत पिंपरी-चिंचवडच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून खासदार कोल्हे राजकीय स्टंट करीत आहेत, असेही अमोल शिवले यांनी म्हटले आहे.
Read Also :
- दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार – किरीट सोमय्या
- समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत – रामदास आठवले
- ‘मुळा’मधील वरिष्ठांच्या त्रासामुळे तरुणाचा गळफास; आत्महत्येमागे अहमदनगरच्या शिवसेना मंत्र्याचा हात?
- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभार रचनेचा खेळखंडोबा थांबेना; फेब्रुवारीत होणारी निवडणूक लांबणीवर जाणार?
- एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पापांचे ओझे डोक्यावर घेऊ नका – भाजप