नागपूर : नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंडेंची नियुक्ती झाल्यानंतर नागपूर महापालिकेत आयुक्त आणि महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांच्यात महापालिका कारभारावरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली होती. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागपुरात टाळेबंदी लावण्यासंदर्भात पाऊले उचलली होती तेव्हा महापौर संदीप जोशी आणि सत्ताधारी भाजपने त्याला विरोध केला होता. आता तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपकडून आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.
कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. नागपूरातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रोज सरासरी 50 च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात लॉकडाऊनची गरज असल्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. महापौरांसह सर्वसामान्य नागरिकांचीनी नागपुरात लॉकडाऊनची मागणी केली आहे.
नागपुरात 71,616 कोरोना रुग्ण
नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. सध्या नागपुरात 71 हजार 616 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 53 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 2261 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.87 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 74.59 टक्के आहे. तसेच, कोरोना डबलिंग रेट 29.1 दिवस इतका आहे (Nagpur Mayor Sandip Joshi Asked For Lockdown).
नागपुरात ‘रेमडेसिवीर’चा मोठा तुटवडा
नागपुरात ‘रेमडेसिवीर’चा मोठा तुटवडा उद्भवला आहे. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट होत आहे. या इंजेक्शनची जास्त दराने विक्री होत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. मेडिकल आणि मयो या सरकारी रुग्णालयांमध्येही ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांना ना वेळेवर उपचार मिळत आहेत नाही औषधं अशी स्थिती आहे.
Read Also;
एनसीबी ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का?-काँग्रेसचा सवालhttps://t.co/TVmZIFfCcX
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020