पुणे : पुणे शहराचा विस्तार झाल्याने आता राज्यातील सर्वात मोठे शहर झाले आहे. परंतू, गेल्या साडेचार वर्षात पुणे शहराची प्रचंड वाताहत झालेली असताना, पुणेकरांना पायाभूत सुविधा मिळणेही दुरापास्त झालेले असताना सत्ताधारी भाजपकडून शहरात खोट्या जाहिरातींचे बॅनर लावण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांच्या या खोट्या जाहिरातींची पोलखोल करून शहराची सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
रोहित पवारांच्या पुढाकाराने खर्डा किल्ल्यावर फडकावला जाणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज
पुणे शहर स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल करत असताना शहरात ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्याच्या विसंगत होर्डिंग सत्ताधारी भाजपचे लावून पुणेकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. काही आठवड्यांपुर्वी पुणे शहर खड्डेमुक्त करू, असे जाहीर प्रकटन सत्ताधारी भाजपने केले होते. परंतू, अद्याप एकही खड्डा बुडवण्याचे काम केले नाही. डेक्कन, कोथरूड, कात्रज, धानोरी या सगळ्या परिसरात खड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे, “विकासाची पोलखोड स्पर्धा” या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना सामील करून घ्याव, अशा निर्धार केला असून भाजपचे महापौर, सभागृह नेते, शहराध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शहराची परिस्थिती दाखवून देवू, असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.
ब्रेकिंग! अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, शेवटचा पर्यायही संपला?
निवडणुकीपुरतेच राष्ट्रवादीचे राजकारण…
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाजकारण करून शहरातील, राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम करते. राजकारणाअगोदर शहराच्या विकासाला महत्त्व देणार पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्ष राजकारण करते पण केवळ निवडणुकीपुरतेच ते मर्यादीत असते. अन्य वेळा राष्ट्रवादी काँग्रेस समाजकारण आणि त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असते. परंतू, दुर्दैवाने सत्ताधारी भाजपने बाराही महिने केवळ राजकारण करून, खोट्या होर्डींग लावून नागरिकांची दिशाभूल करण्याचा पायंडा पाडला आहे. परंतू, भाजपचा खोटारडेपणा जास्त दिवस टिकणार नाही, आगामी महापालिका निवडणुकीत पुणेकर भाजपला त्यांची जागा दाखवून देतील, असेही शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपाला, शरद पवारांचे सडेतोड उत्तर
सर्वोत्कृष्ट सेल्फीस, व्हिडीओस बक्षीस
राष्ट्रवादीच्या वतीने सेल्फी स्पर्धा आणि व्हिडिओ स्पर्धा अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धकांनी शहरातील, आपल्या परिसरातील खड्डे, कचरा, सांडपाणी, वाहतूक इत्यादी समस्या अधोरेखित करणारे सेल्फी अथवा व्हिडिओ काढून ७०५७५७३१३१ या संपर्क क्रमांकावर पाठवावे. सर्वोत्कृष्ट सेल्फीस ११००० रुपये व सर्वोत्कृष्ट व्हिडिओस ११००० रुपये बक्षीस देण्यात येईल. त्यामुळे, जास्तीत जास्त तरूणांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष जगताप यांनी केले आहे.
Read Also :
- प्रशासकीय यंत्रणांनी दबावाखाली भेट टाळली, पालघर दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री भारती पवारांचा आरोप
- “जेवणाला बोलावलं मात्र हात बांधलेले, ही शुद्ध फसवणूक; आरक्षणावरुन शरद पवारांची केंद्रावर टीका
- “…तेव्हा मी त्यांना उत्तरे देईन,” भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खासदार भावना गवळींचे किरीट सोमैयांना आव्हान
- लायकीत राहा! नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करून टाकू, मनसेचा प्रवीण गायकवाडांना इशारा
- “मूर्ख आहात काय? कसल्या अंगार-भंगार घोषणा देतायत, हे शोभतं का?”, पंकजा मुंडेंचा रुद्रावतार