पिंपरी चिंचवड : महापालिकेत भाजपचे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी दुकाने नव्हे तर मॉल उभारले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. याचे पडसाद बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. त्यास प्रत्यूत्तर देताना भाजप आमदाराच्या मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची दुकाने आहेत, चिरीमिरी दिली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गप्प बसतात. विरोध करीत नाहीत, असा पोलखोल भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर केला.
काँग्रेसमध्ये नाराजी: सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा, अतुल लोंढेंची मुख्य प्रवक्तेपदी निवड
पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपची सुत्रे आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे आहेत. त्यांच्याविरोधात पक्षातील नगरसेवकाने बंड पुकारले आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडचा दौरा केला. त्यावेळी ते म्हणाले, पुर्वी सर्वाना विश्वासात घेतले जायचे. यातूनच शहराचा विकास साधला. मात्र, सध्याच्या दोन्ही आमदारांनी शहर वाटून घेतले. ही तुझी बाजू, ही माझी बाजू अशी स्थती आहे. त्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होतो, असे शरद पवार म्हणाले होते.
मतदार याद्यांमधून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
बुधवारी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यातच पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान, पवारांनी उपस्थित केलेल्या मॉलच्या विषयावर आवाज उठवत असताना भाजप नगरसेवकांनी दिलेल्या प्रत्त्यूत्तरामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गप्प बसण्याची नामुस्की ओढवली.
आम्ही आमचे पाहू – महापौर
आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचा हुकूमशाही कारभार सुरू आहे. हस्तक्षेप वाढला आहे, अशी तक्रार तुषार कामठे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी बोट ठेवले आहे. त्यावर माजी महापौर राहूल जाधव आक्रमक झाले. शाब्दिक वादावादी झाली. त्यात हस्तक्षेप करीत महापौर माई ढोरे यांनी मिसाळ यांना थांबविले, हा पक्षांतर्गत प्रश्न आहे, आम्ही आमचे पाहू, असे त्यांनी सांगितले.
Read Also :
- पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावरून खडाजंगी; खासदार कोल्हेंच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर
- माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
- भावना गवळी अजून किती दिवस बाहेर राहाल? ईडी कारवाईवरून किरीट सोमय्याचा निशाणा
- आर्यन खानची केस फेक आहे, पैसे उकळण्यासाठी NCB ने खोटे पुरावे सादर केले – नवाब मलिक
- भाजपच्या नेत्यांना आता लोकं कॉमेडी मॅन म्हणायला लागलेत – नाना पटोले