तामिळनाडू : तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून ते पूर्णपणे जळून राख झालं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 जण होते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघात: तब्बल नऊ जणांचा मृत्यू, बिपिन रावतांची प्रकृती चिंताजनक
लष्कर आणि स्थानिक पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने हा संपूर्ण प्रकार नेमका सांगितला. कृष्णसामी असे या प्रत्यक्षदर्शीचे नाव आहे. त्याने या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, त्याला सर्वात आधी प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. आवाज खूप मोठा असल्याने तो तात्काळ घरातून बाहेर आला. यावेळी त्याला जे दृश्य दिसलं ते खूपच भयंकर होतं. त्याने पाहिले की, एक हेलिकॉप्टर एका दुसऱ्या झाडावर प्रचंड वेगाने आदळत होतं. यावेळी संपूर्ण हेलिकॉप्टरला आग लागली होती.
घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, अन्यथा पुढे ढकला; मंत्री छगन भुजबळ आक्रमक
कृष्णासामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर झाडावर आदळत असताना त्याला आग लागली होती. यादरम्यान कृष्णसामी यांनी 2 ते 3 लोकांना हेलिकॉप्टरमधून उड्या मारताना पाहिले. यावेळी हे सर्व जण आगीत भाजून निघत होते. दरम्यान, घटना प्रचंड गंभीर असल्याने कृष्णसामी यांनी तातडीन जवळ असलेल्या लोकांना एकत्र केलं आणि तात्काळ बचावकार्य सुरू केलं. दरम्यान, सापडलेल्या सर्व मृतदेहांपैकी 80 टक्क्यांहून अधिक जळालेले आहेत. त्यामुळे त्यांची नेमकी ओळख अद्याप पटलेली नाही.
राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण हेलिकॉप्टर अपघात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी अनेकांचे मृतदेह होरपळे असल्यानं त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती मिळते. या चाचणीनंतरच या अपघातातील मृतांबाबत सरकार किंवा लष्कराकडून अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.
Read Also :
- तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना: १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू, मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांमध्ये खडाजंगी; शिवसेनेतील अतर्गत वाद चव्हाट्यावर
- उपमहापौर व भाजप नगरसेवक राजेश काळे यांना दोन जिल्ह्यातून केले तडीपार
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…
- मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान