सातारा : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या एकाच पक्षात असलेल्या दोन नेत्यांच्या समर्थकांत तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. शुल्लक अश्या दुचाकी लावण्याच्या कारणावरुन हा वाद विकोपाला गेल्याची माहिती मिळत असून, या राड्यात सनी भोसलेसह ६ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर शिवेंद्रराजे यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यासह एकूण १६ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळ म्हणतात, सत्य परेशान होता है, पराजित नहीं! सोमय्या म्हणतात, आगे आगे देखो, होता है.!
दरम्यान, या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील कार्यालयासमोर हा प्रकार घडला असून, या मारामारीत धारदार शस्त्राचा वापर झाल्याची देखील माहिती मिळत आहे. या दोन नेत्यांच्या समर्थकांत नेहमीच असे प्रकार घडत असतात. मात्र यावेळी हल्ल्यात शस्त्रांचा वापर झाल्याने, गुन्हा दाखल केलेल्या १६ जणांविरोधात कठोर कारवाई केली गेली असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रं उघड करण्याची हिंमत का दाखवत नाहीत? – किरीट सोमय्या
काही दिवसांपूर्वी, उदयनराजे भोसले यांनी अचानकपणे शिवेंद्रराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यांनतर अनेकांचे डोळे विस्फारले गेले होते. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले होते. मात्र, उदयनराजेंच्या एका नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी तेव्हा उदयनराजे स्वत: शिवेंद्रराजेंना भेटल्याची माहिती नंतर दिली गेली होती.
Read Also :
- परमबीर सिंग आणि भाजपचं साटंलोटं? नवाब मलिकांनी केला गंभीर आरोप
- राष्ट्रवादीच्या बैठकीवर आणि मुख्यमंत्री-पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणतात…
- ठाकरे कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी धडपड, महिलांवरील अत्याचाराबाबत नीलम गोऱ्हे यांचे मौन का?
- कोर्टाच्या दिलासादायक निर्णयांनंतर भुजबळांनी, शायराना अंदाजात दिली पहिली प्रतिक्रिया
- ब्रेकिंग! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांसह ७ जणांची निर्दोष मुक्तता