राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज दिल्लीत राज्यसभा सदनात सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्रातून सात जणांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, भागवत कराड, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी खासदारकीची शपथ घेणार आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेले 62 खासदार आज शपथ घेतील. जे खासदार आज येऊ शकणार नाहीत, त्यांची अधिवेशनावेळी सभागृहात शपथ घेतली जाईल.
भाजपचे ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान आणि जनता दल-सेक्युलरचे प्रमुख एचडी देवगौडा, जेडीयूकडून हरिवंश नारायण सिंह, रामनाथ ठाकूर असे अनेक नेते आज शपथ घेतील.