पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या 14 जूनला 53वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात 53 फूट उंचीचे त्यांचे भित्ती चित्र साकारण्यात येणार आहे.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या भित्ती चित्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने हे भित्ती चित्र साकारण्यात आले आहे.
वसंत मोरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, पुण्यातील कात्रज चौकात राज ठाकरेंच्या 53 व्या वाढदिवसानिमित्ताने 53 उंचीचे महाराष्ट्रातील पहिले भित्ती साकारण्यात येत आहे. लवकरच या भित्तीचे चित्राचे उद्घाटन केले जाणार आहे.
तुम्ही सेल्फी काढायला नक्की या बरं का, मी वाट पाहिन, असे म्हणत त्यांनी भित्ती चित्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका मोठ्या इमारतीच्या चित्रावर राज ठाकरेंचे चित्र काढल्याचे पाहायला मिळत आहे.
Read Also :
- प्राधिकरणाचा उद्देश साध्य झालेला नाही; भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी कोर्टात जाणार
- ‘मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या’
- आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला सरकार देणार 600 कोटी
- ‘मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी’
- 2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा का? जयंत पाटील म्हणाले…