ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील एका प्रकरणाबाबत सरकारला सवाल केला आहे. रस्ता रूंदीकरणासाठी मुंब्रा येथील शिळफाटा रस्तालगतची इस्मालिया इमारत २०१९ मध्ये पाडण्यात आली होती. मुंब्रा येथील दोस्ती म्हाडा प्रकल्पामुळे बाधित ४२ ब्लॉकधारकांना सदनिकाचे वाटप करण्यात आले यातच गैरव्यवहार झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंब्रामध्ये अनेक प्रकल्प ग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली आहेत. वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी डोळे बंद करून सह्या केल्या पाहिजे. तसे झाले. हरून तांबोली ला घर मिळाले. मात्र घराचा ताबा मात्र दुसऱ्यानेच घेतला आहे.
आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये काही कागदपत्रेही जोडली आहेत. त्यात पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, कागद पत्रांमधली डॉली परमार कोण? हे व्यवहार कोण करायचे. २०० कोटी रूपयाचे फ्लॅट असेच दिले गेले. खोट्या बिल्डिंगी पडलेल्या दाखवल्या. एखादी बिर्ल्डिंग पडली. भाडेकरू ४० फ्लॅट दिले गेले. ७०… ४० पण खरे नाहीत व वरचे तीस तर खोटेच आहेत. २०२१ मध्ये पोलीस केस झाली आणि अचानक बंद झाली. का कोण उत्तर देणार? असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या… अब्जो रूपये.. फक्त सांगायचे की पोहचले. आजही स्थावर जंगम विभागाचा साहाय्यक आयुक्त. कपाटे उघडून कागद पत्र गहाळ करतो आहे. सब गोलमाल है.. ठाणेकरांचे करोडो रूपये डोळ्या देखत खाल्ले.. आयुक्त साहेब उत्तर द्या. आपण चुप का? असा सवाल त्यांनी ठाणे महानगरपालिकेला केला आहे. पोलिस केस जी मुंबऱ्यात गेली तिचे काय झाले. असा सवालही त्यांनी केला आहे.
मुम्बर्या मध्ये अनेक बाधित प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली वरच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी डोळे बंद करुन सह्या केल्या पाहिजे तसे झाले .. हरून तांबोली ला घर मिळाले ताबा दुसर्ये ने घेतला … कागद पत्रां मधली डॉली परमार कोण … हे व्यवहार कोण करायचे … २००… https://t.co/TQtIp61Z06 pic.twitter.com/j8bEjXV2vR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 19, 2023
Read also
- हेही वाचा….इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक
- हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
- हेही वाचा…उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
- हेही वाचा….पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?
- हेही वाचा….शिवसेना अन् धनुष्यबाणासंदर्भात निवडणुक आयोगाचं कोर्टाला पत्र, उद्धव ठाकरेंच्या टिकेवर उत्तर