मुंबई : आमदार निलेश लंके यांच्यावर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपानंतर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत लंकेंवर आरोप केले होते. त्यांनतर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी वाघ यांच्यावर फेसबुकवरून जहरी टीका केली असून, त्यावर वाघ यांनी देखील ट्विट करून जोरदार पलटवार केल्याने, या नेत्यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले असल्याचे पाहायला मिळत आहे.
संजय राऊत तोंडघशी पडले, बेळगांव महानगरपालिकेवर भाजपची मुसंडी, स्पष्ट बहुमत
नगरमध्ये एका कार्यक्रमात वाघ यांनी केलेल्या लंकेवरच्या आरोपाला उत्तर देताना शेख यांनी, “चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको, ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते. मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय? महिलांचा आदर आम्हाला शिकवताय? राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. तुम्ही नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा,” असा जोरदार हल्लाबोल केला होता.
कुणाला विचारायची आवश्यकता नाही .
जस आम्ही म्हणतो की आमची नार्को करा तस म्हणा नवर्याची पण नार्को करा …
कर नाही त्याला डर कश्याला ओ .
आणी भुंकतय कोण हे महाराष्ट्र बघतोय .
आणी मी पण बाप बदलणाराचे बापाला पण भित नाही ….— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) September 6, 2021
समन्सनंतर आता ईडीकडून देशमुखांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी
दरम्यान, या जळजळीत टीकेचा समाचार वाघ यांनी ट्विट करून घेतला असून, “सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरु आहे. पण मी अ्सल्या प्रकाराला घाबरत नाही. मी काय आहे, काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघावर, कोल्हे कुत्रे भुंकत असतात. कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून, पण शेवटी मी वाघ आहे. लक्षात ठेवा. कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही,” असं थेट आव्हान त्यांनी शेख यांना दिलं आहे.
वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत 🤣😂
कारण
मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणूनसत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू
मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या
वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 6, 2021
त्यावर आता पुन्हा शेख यांनी प्रत्युत्तर दिलं असून, “आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणी बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही, डायलॅाग बाजी सोडा आणी आपल्या नवर्यावर ५ जुन 2016 ला कार्यवाही झाली तेव्हा सरकार कुणाच होत ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कार्यवाही केली होती याच उत्तर द्या. आणी तुम्ही काय आहात हे आम्ही पाहील आहे कुणाला विचारायची आवश्यकता नाही. जस आम्ही म्हणतो की आमची नार्को करा तस म्हणा नवर्याची पण नार्को करा …कर नाही त्याला डर कश्याला ओ. आणी भुंकतय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणी मी पण बाप बदलणाराचे बापाला पण भित नाही,” असा हल्लाबोल केला आहे.
Read Also :
- करुणा शर्मा पोलिसांच्या ताब्यात, पिस्तूल प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया… काय म्हणाले…
- शरद पवार यांना तात्काळ अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ – गुणरत्न सदावर्ते
- वसंतदादा पाटीलांचा विश्वासघात करून पवारसाहेब आघाडीतून कसे बाहेर पडले? -भाजप
- तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का?
- पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव; करूणा शर्मा बंदुकीसह पोलिसांच्या ताब्यात