मुंबई : वांद्रे पुर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना विधानसभेचे जाहीर करण्यात आली. यानंतर पक्षात इतरही चांगले उमेदवार इच्छुक होते. मात्र बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, असे म्हणत मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आता ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. याच मतदारसंघात अजित पवार गटाकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून वरून सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता अखिल चित्रे यांच्यामुळे ठाकरे गटाची याठिकाणी ताकद वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत ‘मनसे’ कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत
अखिल चित्रे म्हणाले की, ज्या विचाराबरोबर मी गेल्या 18 वर्षांपासून होतो. तो विचार आता माझ्या पूर्वीच्या पक्षातून बाजूला टाकण्यात आला आहे. राज ठाकरे आताच मागे म्हणाले होते की, मला दुसऱ्यांची मुलं अंगावर खेळवायची नाहीत. मला माझीच मुलं खेळवायची आहेत. माझ्यात ती क्षमता आहे. पण वांद्रे पूर्वेत चार पक्ष फिरुन आलेल्या महिलेला तिकीट देण्यात आलं. त्या इकडे निवडून येण्यासाठी आल्या नाहीत तर फक्त कुणालातरी पाडण्यासाठी उभ्या आहेत. अशा विचाराने राजकारण होत नाही. त्यामुळे मी आधी जिथे होते तिथे परत जावं असं मला वाटलं”.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध..! काय काय केल्या घोषणा ?
मनसेकडून या मतदारसंघात तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावर ते म्हणाले की, “तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळाली म्हणून मी नाराज होतो असं नाही. वांद्रे पूर्वेत इच्छुकांची यादी होती. मनसेचे इतर जण उमदवारीसाठी इच्छुक असताना बाहेरुन आलेल्याला तिकीट दिलं. आपण जे म्हणतो तेच कॉन्ट्रॅटिक्ट करतो त्याला कंटाळून मी इथे आलो”.
याआधी त्यांनी एक सुचक ट्विट पण केले होते. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं… खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला… राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा… असा इशारा पण देण्यात आला होता.
ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांची यादी
१. महिला उपविभागप्रमुख- रेणुका तांबे
२. वरळी विधानसभा समन्वयिका- विजया महाजन
३. शाखा क्र. १९६ चे शाखाप्रमुख- श्रीकांत जावळे
४. शाखा क्र. १९८ चे शाखाप्रमुख-संतोष शिंदे
५. शाखा क्र. १९९ चे शाखाप्रमुख ज्ञानदेव सणस
६. वरळी विधानसभा अध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग)- अन्वर खान दुराणी
७. शाखा १९६ चे युवा शाखासमन्वयक अथर्व राणे
८. प्रहार महासंघ महाराष्ट्र सचिव- निखिल सावंत
९. शाखा १९५ च्या समन्वयिका-मोहिनी मोहिते
१०. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाग १९९ च्या माजी वॉर्ड अध्यक्ष- शिला सिंग
११. शाखा १९५ च्या उपशाखाप्रमुख रेश्मा धोत्रे
READ ALSO :
हेही वाचा…वडगावशेरीत ‘सुनील टिंगरे’ रेडझोनमध्ये..? बापू पठारेंचं तगडं आव्हान
हेही वाचा…“फडणवीस चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात”, मतदारसंघात कॉंग्रेसचे दुखणे काय ?
हेही वाचा…माजी आमदाराला लोकं कंटाळलीत, पुरंदरमध्ये संभाजी झेंडे प्रचारात सक्रीय
हेही वाचा…पतीसाठी पत्नी पुतण्याच्या विरोधात प्रचाराला मैदानात उतरली.. कोण मारणार बाजी?
हेही वाचा…बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई