मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी पार पाडून दोन महिने उलटले असले, तरीही ते अजून वर्षा या अधिकृत निवासस्थानी राहायला गेलेले नाहीत. यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करत, त्यांनी कामख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगे तिथे पुरली असल्यानेच फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा केला होता. या विधानावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून, आता शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…९० दिवसात टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार..! उदय सामंतांनी सांगितली आतली बातमी
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय गायकवाड यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जोरदार टीका केली. “कामख्या देवी ही अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी पूजा-अर्चना करणे ही अंधश्रद्धा नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो, तेव्हा हे जागृत देवस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि म्हणूनच आम्ही तिथे दर्शन घेतले,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
याशिवाय, संजय राऊत सतत “शिंग आणून पुरली” अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचे सांगून, “एक शिंग मी नक्की आणणार आणि ते तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही,” अशा शब्दांत गायकवाडांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली.
हेही वाचा…ठाकरे गटातील कोणते ६ खासदार शिंदे गटात जाणार ? उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा धर्मसंकट ?
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना “भाजपचा अपेंडिक्स” असे संबोधले होते. यावर प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाले, “भाजपला कधीही अपेंडिक्स झालेला नाही. उलट, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. संजय राऊत आणि त्यांच्या नेत्यांना त्रास होतोय की, ५० पैकी एकही आमदार निवडून येणार नाही असे भाकीत केले होते, पण आम्ही ६०-६१ आमदार निवडून आणले. हे सत्यच त्यांना त्रासदायक ठरत आहे.”
उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना गायकवाड म्हणाले, “अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तुम्ही पुतळा का उभारला नाही? पाच वर्षे भाजपसोबत सत्ता आणि पंचवीस वर्षे पालिका ताब्यात असूनही पुतळा का उभारला नाही? लोकांवर टीका करणे सोपे असते, पण स्वतः काही काम करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.” याशिवाय, रायगडचा पालकमंत्री शिवसेनेचाच असायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या जनता दरबारावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, “हे दोघेही आपल्या पक्षाचे आणि जनतेचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी जनता दरबार घेतला. आम्ही युतीमध्ये आहोत आणि विरोधकांचे अस्तित्व संपत चालले आहे. काँग्रेसचे केवळ १६ आमदार उरले आहेत, आणि शिवसेनेची अवस्था सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कितीही टीका झाली, तरी आम्ही आमचे काम चालूच ठेवू.”
हेही वाचा…“त्यामुळेच राहुल गांधींची आता रडारड सुरू झालीय”, भाजपचा राहुल गांधींवर पलटवार
हेही वाचा…कृषी विभागातील सर्वात मोठा घोटाळा..! धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढल्या
हेही वाचा…“तोच विनोद पुन्हा-पुन्हा..”, राहुल गांधींच्या दाव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…भाजपने चिटींग करून महाराष्ट्रात निवडणूक जिंकली..! राहुल गांधींनी थेट पुरावाच दिला
हेही वाचा…ठाकरे गटाच्या खासदारांची वज्रमुठ, पत्रकार परिषद घेत जाहिर केली भूमिका