पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना सुनियोजित षडयंत्र आखून जाळ्यात अडकविल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे. मात्र, या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेऊन या कटकारस्थानाचा मूळ शोधण्यासाठी भाजपाच्या पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाचा मनमानी कारभार, ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची अचानक हकालपट्टी!
माधुरीताई उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडला जाणार असून, त्या सर्वांची भेट घेऊन या तक्रारी मागचे सत्य जाणून घेतील आणि त्याचा अहवाल माझ्याकडे सुपूर्द करतील, असेही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले आहे. सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या लोकप्रतिनिधींवर आरोप केले जात आहेत. त्यांना अडकविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे व लवकरच सत्य बाहेर येईल, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे हे प्रकरण…..
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समितीचे सभापती व भाजपचे नगरसेवक नितीन लांडगे यांच्यासह चार जणांना एसीबी पथकाने ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज स्थायी समितीच्या बैठकीत धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला.
महापालिकेचा एक ठेकेदार स्थायी समितीला देय ठरलेली २ लाख रुपये रक्कम घेऊन महापालिकेच्या पार्किंगमध्ये आला. त्याने मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे यांना पालिकेच्या पार्किंगमध्ये बोलावून गाडीमध्ये पैसे त्यांच्या ताब्यात दिले. त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पिंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांला अधिकाऱ्यांनी थेट स्थायी समितीच्या कार्यालयात घेऊन गेले आणि सर्व कार्यालयाची झाडाझडती घेतली यामध्ये लाखो रुपये आढळल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व पैसे कशासाठी व कोणा कोणाकडून आले याची माहिती गोळा करत आहेत.
चांदनी चौकातील खड्डे आठ दिवसांत बुजवा, कारणे देऊ नका; चंद्रकात पाटलांची अधिकाऱ्यांना तंबी
या चौकशीनंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांना काही कागदपत्रे व रोकड आढळली आहे.
Read Also :
- आता उद्धव सरकारचा काळ संपला, राज्यात भाजपची सत्ता येणार; जन आशीर्वाद यात्रेत राणेंचा एल्गार
- आता तरी देव आम्हाला पावणार का? १५ लाख देणार का? देव चोरला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन
- अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, बघू कोण हरतं; रावसाहेब दानवेंचं ओपन चॅलेंज
- …अन् चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले; कोथरूडमध्ये घडला अपघात
- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड; पाच जण ताब्यात