कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्यानंतर त्याच्यां कागल गडहिग्लज विधानसभा मतदारसंघात तीव्र पडसाद उमटले आहेत. मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचां जाहीर निषेध करीत आहेत. मंत्री मुश्रीफ हे या मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. ठिकठिकाणी सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती भर चौकात जाळण्यात आली आहे. विविध पदाधिकारी यांनीही निषेधाची पत्रके प्रसिद्धीस दिली आहेत. पोलीसांनी संवेदनशील गावात पोलिसांना पाठवले आहे.
१०० कोटीचा दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? – चंद्रकात पाटील
मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परीषद घेऊन अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचे जाहीर केल्यानंतर वातावरण थोडे शांत झाले आहे. कागल मुरगुड या शहरात गटागटाने निषेध व्यक्त केला. तर शिवसेना कार्यकर्त्यांनीही किरीट सोमय्याचा निषेध केला आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप काय?
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला.
मुश्रीफ ठोकणार सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा, पाटील-घाटगेंनाही दिला इशारा
बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.
Read Also :
- मोठी बातमी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे ५ ऑक्टोंबरला मतदान, निवडणुक आयोगाची घोषणा
- ‘इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा,’ मलिकांचा घणाघात
- साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल
- अनिल देशमुखांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ईडीने उचलले मोठे पाऊल
- ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसीच होणार!’ वडेट्टीवारांचं विधान