पुणे: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरातही अत्यंत दिमाखात साजरी होत आहे. मात्र, या शिवजन्मोत्सवाला राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दांडी मारली. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिकांचा अभिनय करुन मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर कोल्हे खासदार झाले. पण, स्वत:च्या मतदार संघातील शिवजन्मोत्सवाला हजेरी उपस्थित राहू शकले नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
हे पण वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुण्याचा दौरा; मुरलीधर मोहोळांच्या ‘राजकीय’ वजनात होणार वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर देखील शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे मात्र या सोहळ्याला अनुपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका वठवून घराघरात पोहोचलेले खासदार जन्मसोहळा साजरा करण्यासाठी मात्र पोहोचू शकले नाही. यामुळे राज्यातील शिवप्रेमींसह स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हे पण वाचा, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे आंदोलन; भाडोत्री लोकांचा एक फ्लॉप शो !
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी त्यामुळे आलेले निर्बंध या सर्वांमध्ये गेल्या दोन वर्षापासून शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी झाली नाही मात्र सध्या परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे शासनाने शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली त्यामुळे किल्ले शिवनेरीवर शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात पोलिसांकडून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोलताशांचा गजर आणि पोवाड्यांचा आवाज संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर दुमदुमला. शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मात्र या सर्वांमध्ये या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार अमोल कोल्हे कुठे आहेत हा प्रश्न सर्वांना पडला त्यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती.
हे पण वाचा, शिवसेनेच्या आणखी एका घोटाळ्याची पोलखोल करणार; भाजप आमदार मिहिर कोटेंचा इशारा
शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवभक्तांसाठी उत्साहाचा दिवस असतो. शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते. या वर्गाचे मागील पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे या सोहळ्यासाठी हिरीरीने सहभाग घेत असत. ही प्रथा परंपरा मात्र खासदार कोल्हे यांनी मोडली. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर आज राज्यातील प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये मात्र खासदार कोल्हे यांचा पत्ता नव्हता.
हे पण वाचा,
कोर्लईमध्ये भाजप- शिवसेनेत राडा; सोमय्या येताच गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण
टीका करतात आणि कोकणात येऊन पडतात; उदय सामंतांचा नाव न घेता राणेंवर प्रहार
“विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा”आमदार महेश लांडगे