बीड: केंद्रात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद नाकारल्यानंतर त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली होती. मुंडे यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील, मुंबईतील, सोलापुरातील समर्थकांनी पदांचे राजीनामे दिले मात्र पंकजा यांनी पत्रकारपरिषदेत सर्व समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना संयम ठेवण्यास सांगितले. आता पंकजा मुंडे यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त केले आहे तसेच ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली आहे.
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
हे पण वाचा, साखर उद्योगातील समस्यांवर सकारात्मक तोडगा काढा; जयप्रकाश दांडेगावकरांच्या पवारांना सुचना
भारतीय जनता पक्षाचा नेत्या पंकजा मुंडे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. पीएफचे एक कोटी ४६ लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळालेली आहे. कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळात कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत होती.
हे पण वाचा, केंद्र सरकारकडून होणारी साखर उद्योगाची कोंडी अन् आर्थिक संकटात सापडलेले साखर कारखाने
हे पण वाचा, जरंडेश्वर कारखाना: १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची नोंद अन् शेतकरी आणि ऊस पुरवठादार चिंतेत
औरंगाबादच्या एपीएफओ कार्यालयाने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाखांची वसुली केली आहे. उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु आहे. दरम्यान १९ महिने ७०० कामगारांना पगारच मिळाला नसल्याचे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये कारखाना बंद केला होता. जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कारखाना सुरु करणार नसल्याची भूमिका घेत कामगार संपावर गेले होते. एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला जोतं मात्र मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते.
हे पण वाचा,
जलसंधारण मंत्री शंकराव गडाखांच्या मुळा कारखान्याला ८ दिवसांचा अल्टिमेटम
अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
उभारणीपासून ते आतापर्यंत चर्चेत असणाऱ्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ‘१८ वर्षांची’ अशी आहे लढाई
अजितदादा आणि बाळासाहेब थोरात अगस्ती साखर कारखाना चालविण्यास घेणार, असे मी म्हटलोच नाही