IMPIMP

बंडखोर उमेदवारांवर कॉंग्रेसकडून कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन नेत्यांवर केली कारवाई

kamal vyavahare WITH aba bagul

पुणे : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केलेल्या नेत्यांवर आता कारवाईचा बडगा उचलला जात आहे. अलीकडेच भाजपने तब्बल 40 बंडखोर नेत्यांवर  कारवाई केली आहे.  अशातच आज काँग्रेसने पाच बंडखोर नेत्यांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.  महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.  यामध्ये पुण्यातील दोन काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. यात पर्वतीत ‘आबा बागुल’ तर कसबा पेठ मतदारसंघात ‘कमल व्यवहारे’ यांना काँग्रेस मधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा…“जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”, हेमंत रासनेंची ग्वाही 

पर्वती मतदारसंघातून उमेदवारी मिळावी,  यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून ‘आबा बागूल’ वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते.  यासाठी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून उमेदवारीची मागणी केली होती.  मात्र महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला गेल्याने अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली.  त्यानंतर ‘आबा बागुल’ यांनी पर्वती मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यामुळे त्यांच्यावर आता काँग्रेसने सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली.  याच मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार ‘माधुरी मिसाळ’ तर महाविकास आघाडी कडून अश्विनी कदम’ निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.  यात आबा बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यामुळे महाविकास आघाडीतील कदम आणि बागुल यांच्यातील मत विभागणी होऊन मिसाळ यांना फायदा होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा…शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार ; पण…. ? 

कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, म्हणून ज्येष्ठ नेत्या ‘कमल व्यवहारे या काही दिवसांपासून आग्रही होत्या.  त्यांनी उमेदवारीसाठी इतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.  गेल्या 40 वर्षांपासून आपण काँग्रेसचे निष्ठेने काम करत आहे.  मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केला,  असं म्हणत त्यांनी काँग्रेस पदाचा राजीनामा दिला होता.  त्यानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यावर आता काँग्रेस पक्षाने त्यांना सहा वर्षापर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.  याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात आहे.  त्यांचा सामना भाजपचे हेमंत रासने यांच्या सोबत होणार आहे.  आता या तिरंगी लढतील या मत विभागणीचा फायदा कोणाला होणार ?  ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान,  अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पर्वती तसेच कसबा पेठ अशा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना लीड घेता आले नाही.  तसेच काँग्रेसमधील नेत्यांची उमेदवारी मिळवण्यासाठी असलेली खदखद तसेच अंतर्गत वाद यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसणार का ?  त्याचीही चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत ‘मनसे’ कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत 

हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध..! काय काय केल्या घोषणा ? 

हेही वाचा…“बळीराजाला वाचवण्यासाठी राज्यात आघाडीचं सरकार यावं”, शरद पवारांचा विश्वास

हेही वाचा…चंद्रकांतदादांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली ! 

हेही वाचा…सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टिका, अजित पवार संतापले, म्हणाले… 

 

Total
0
Shares
Previous Article
HadapSar

प्रशांत जगताप अन् चेतन तुपेंच्या लढाईत 'मनसे' कुणाला धक्का देणार ? हडपसरमध्ये तिरंगी लढत

Next Article
Sunetra Pawar

पतीसाठी पत्नी पुतण्याच्या विरोधात प्रचाराला मैदानात उतरली.. कोण मारणार बाजी?

Related Posts
Total
0
Share