बॉलीवूड विश्ववाला आणखी एक धक्का बसला आहे अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौकसेचं निधन झालं असून ती कॅन्सरग्रस्त होती तिची हि कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे.
दिव्याच्या मृत्यू सांदरबाटली माहिती तिच्या मावस बहिण सौम्याने फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे . दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निधनापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ती मृत्यूच्या जवळ आहे. दिव्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोस्ट पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
तिने आपल्या शेवटच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं होतं की, ‘शब्द ती गोष्ट सांगू शकत नाहीत जे मला सांगायचं आहे. माझ्याकडे बरेच दिवसांपासून सहानूभूति देणारे मेसेज येत आहेत. परंतु, वेळ अशी आहे की, मी तुम्हा लोकांना सांगू इच्छिते की, मी सध्या मृत्यूशय्येवर आहे. परंतु, मी खंबीर आहे. कदाचित अजिबात दुःख नसलेलं आणखी एक आयुष्य असतं. सध्या कोणताच प्रश्न नाही. फक्त देवच जाणतो की, तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.’
चित्रपट ‘है अपना दिल तो आवारा’ मधून दिव्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. दिव्या अनेक टीव्ही शो आणि जाहीरातींमध्येही दिसून आली होती.