सुशांत सिंग प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही असं छातीठोकपणे सांगतो, ज्यांना वाटतं आदित्य यांचा संबंध आहे त्यांनी मीडियासमोर येऊन पुरावे सादर करावेत. पुरावे असतील तर बोलावं असं आवाहन शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.
सुशांतचे आत्महत्याचे प्रकरण राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उठली आहे. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्ये मागे राजकारणी नेत्याचे हात असल्याची चर्चा होत होती यातच युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात होते. मात्र यावर आता शिवसेना मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुशांत सिंग याबाबत अनिल परब म्हणाले की, केवळ युवा नेत्याचं नाव खराब करायचं, मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढतेय ते पाहून अशाप्रकारे नाव खराब करायचं हे सुरु आहे, नरेंद्र मोदींवर ग्रोधा हत्याकांडाचा आरोप आहे, अमित शहांचा सोहराबुद्दीन प्रकरणात नाव घेतलं गेलं, न्या. लोयांच्या मृत्यूप्रकरणी किती नावं घेतली गेली. आरोप करुन प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न याआधीही अनेकदा झाले आहेत. जे लोक व्हॉट्सअपवर हा मेसेज फिरवतायेत ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत हे माहिती आहे. आम्ही तक्रार केली आहे, पोलीस तपास करतील, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, जे पुरावे असतील ते समोर घेऊन या असं त्यांनी सांगितले आहे.