मुंबई : देशातील सर्वात मोठा वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यामातून महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेल्याने माजी पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणावरून भाजप आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळत आहे.
सोमय्यांचा घाव अनिल परबांवर बसला..! रिसोर्ट तुटणार, परब अडकणार..?
वेदांत प्रकल्प हा एक लाख कोटी रूपयांची गुंतवणुक असलेले डिस्ले फॅब्रिकेशन, 63 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचे समीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रूपयांचा चाचणी प्रकल्प आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहे. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
तो 12 हजार कोटींचा ‘दंड पेंग्विन’ सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ?” भाजपचा सवाल
खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त आहे. प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही. खोके सरकारला माझी विनंती आहे, पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावं जेणेकरून तरूण बेरोजगारांना रोजगार मिळेल. हा प्रोजेक्ट इतर राज्यात गेला त्याचे दु: ख नाही. पण आपल्या राज्यात का आला नाही, याचे आश्चर्य आहे. असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
ज्या प्रोजेक्टवर एवढं काम करून मविआ सरकारने एवढं पाठबळ देऊनही हा प्रोजक्ट तिथे जाणे, याचा अर्थ हाच की नवीन गुंतवणुकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही, असा हल्लाबोल देखील आदित्य ठाकरे यांनी शिंद सरकारवर केला आहे. त्याचबरोबर वसूली कारभारामुळे किती उद्योग गेल्या अडीच वर्षात राज्याबाहेर गेले याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्यावे. नंतर फॉक्सकॉनच्या थापा माराव्यात असं भाजपने अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.
वेदांतचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समजले. वेदांतला आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो. pic.twitter.com/ipBwOWLKvW
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
Read also
- “जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
- “पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
- “उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
- “दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
- “हिमंत असेल तर मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा”; अजित पवार