परभणी ग्रामीण भागाच्या विकासाचा प्रमुख मार्ग हा गावांना जोडणार्या रस्त्यावरुनच जातो त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणारा रस्ता तयार करण्यासाठी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकरकराव गुट्टे यांनी पुढाकार घेत लॉकडाउनच्या कालावधीत देखील ग्रामीण भागात विकासाची गंगा थांबू नये यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मतदारंसघातील सुमारे 20 कोटी रुपयांच्या रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती गुट्टे यांनी दिली आहे.
आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांच्या पाठपुराव्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 20 कोटी रुपयाचा विकास निधी रस्त्यांसाठी मिळाला आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 30.82 किलोमीटर रस्त्याचे काम केले जाणार आहे.
गाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड, पालम व पूर्णा या तीनही तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडणारे रस्ते तयार व्हावेत हे ध्येय उराशी बाळगून आमदार डाँ. रत्नाकरराव गुट्टे यांनी मतदारसंघाच्या विकासाचा मॅप तयार केल आहे.
ग्रामीण भागाची उन्नती करायची असेल तर ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते महत्वाचे असल्यामुळं आमदार गुट्टे यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व अन्य विभागाकडून निधी उपलब्ध करुन घेतला.