मुंबई : आदित्य ठाकरेंनी रत्नागिरीमध्ये बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर शिवसेनेचे नेते भास्करराव जाधवांची देखील मोठी सभा कोकणात पार पडली. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोर आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् भास्करराव जाधव यांच्यावर निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भास्करराव जाधव यांनी रामदास कदमांना अगदी खालच्या भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.
“मला काही समजतं नाही, राज्यात काय नेमकं काय चाललंय”; राज ठाकरेंचं भाष्य
रामदास कदम यांची दापोलीतील सभा संपुर्ण राजकीय वैचारीक बैठकीला छेद देणारी सभा होती. रामदास कदमांनी वापरलेली भाषा आजतागायत कुणीही वापरली नाही. रामदास कदमांनी वापरलेल्या भाषेचा विषय जस जसा महाराष्ट्रात जाईल. तसतशी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पुजा करतील. मुंबईत एक कोटी 30 लाख जनता राहते. त्या जनतेकरता मुंबईत शौचालयांची व्यवस्था आहे. त्या शौचालयांतून जेवढी घाण बाहेर पडत नाही. तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली असा खोचक टोला त्यांनी लगावला.
“शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना असं समीकरण”; दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे आपेक्षार्ह विधान केलं, ते मी कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाही. खासगीमध्येही त्याचा उल्लेख करू शकत नाही. ते विधान जेव्हा महाराष्ट्रातील लोकांच्या कानावर जाईल, तेव्हा रामदास कदमांची जोड्यांन पुजा होईल. त्यामुळे मला वाटतं की, रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करायला हवं. असंही ते म्हणाले.
“आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील
दरम्यान, दापोलीतील सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, वारंवार मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तु त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का? असा खोचक टोला देखील त्यांनी हाणला.
Read also
- “संजय राऊतांना सुटका नाहीच”; राऊतांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला
- “राम मंदिराआधी अयोध्यात योगीच मंदिर; काॅंग्रेसचा खोचक टोला, म्हणाले, पहिले 33 कोटी होते, आता..;”
- “किरीट काका भाजप व शिंदे सरकारने तरी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं”, मिटकरींना डिवचलं
- मतदारसंघात एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही : चंद्रकांत पाटील
- “माॅंसाहेबांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याऱ्या कदमांना सुट्टी देऊ नका भावांनो”; सुषमा अंधारे भडकल्या