मुंबई : सहसा वकील मग ते कोणतेही असोत जाहीर कार्यक्रमात आपली मते व्यक्त करताना जरा सावध असतात. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जाहीर कार्यक्रमात मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चाचे, एका कार्यक्रमात बोलताना कौतुक केले. तसेच, “मी न घाबरणारा मराठा, तर एकनाथ शिंदे खंदा मराठा आहेत,” असंही मत त्यांनी यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात मांडलं.
“त्या एका व्यक्तीमुळे भाजप-शिवसेनेचं २५ वर्षाचं नातं बिघडलं,” संजय राऊतांकडून नाव जाहीर
विशेष सरकारी वकील, ऍड. उज्वल निकम आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित होते. “वकिलाला भाषणाची सवय नसते आणि फुकट तर वकील बोलतच नाही,” या त्यांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला, तर “मराठा समाजाची पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंत मोठी आहे. मोर्चे कसे काढावेत, हे आपण कोपर्डी घटनेनंतर दाखवून दिलं,” असं ते म्हणाले.
यावेळी, सोहळ्याला माजी राज्यपाल डी वाय पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनीही, “मराठा समाजाचे हक्क मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही,” अशी ग्वाही दिली. “मराठा महासंघाची ही वास्तू उभी राहत असून, 120 वर्ष जुनी परंपरा असलेला महासंघ आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलनं झाली, सर्वजण रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजाचा हक्क मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Read Also :
- पुणे महापालिकेचा तालिबानी कारभार: दिवसाला १० लाख रुपये वसूल करा, पालिका प्रशासनाने दिलं टार्गेट
- जोर का झटका : नारायण राणे यांना बसला विजेचा शॉक, सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही
- ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
- नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक
- “…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल