मुंबई: शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील दमदाटीवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणात मात्र सावध भुमिका घेतली आहे. “भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हे पण वाचा: दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
तिवृष्टीने बाधित झालेल्या आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या चिपळूणचा ४ दिवसांनंतर आज मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे उध्वस्त झालेल्या लोकांच्या भावना, व्यथा, प्रश्न ऐकून घेतले, जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यसोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, परिवहन मंत्री अनिल परब होते.
हे पण वाचा: पुणे महानगर नियोजन समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
दरम्यान, चिपळूणमधल्या सर्वाधिक नुकसान झालेल्या बाजारपेठेतल्या, एका गल्लीत हा ताफा आला असताना, एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला असता, आमदार जाधवांनी कुत्सितपणे हसत त्या महिलेला, “५-६ महिन्याचा दिला तरी आता काही होणार नाही. तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली.
हे पण वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
तसेच, मुख्यमंत्र्यांसमोरच आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर त्यांनी, थेट हात उगारल्याचा व्हिडीओही सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, यात त्यांनी थेट हात उगारल्याचं स्पष्टपणे दिसुन येत आहे. आता या प्रकरणामुळे भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी, राज्य सरकार अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Read Also :
- सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत, प्रीतम मुंडेकडून मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- “भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब