भारत- चीन युद्धामुळे भारतात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत भारताने चीनविरोधात अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे.
भारतानंतर आता अमेरिकाही टिकटॉकसह इतर चिनी अॅपवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ म्हणाले की, अमेरिका चीनच्या सोशल मीडिया अॅपवर (टिकटॉकसह) बंदी घालण्याचा विचार करीत आहे.
पुढे त्यांनी असेही सांगितले की, मी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा निर्णय अत्यंत गंभीरपणे घेत आहोत. कारण भारताने चिनी अॅपवर बंदी आणली असून ऑस्ट्रेलियाही यावर विचार करीत आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच या निर्णयावर विचार करत आहोत.