मुंबई : राज्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरीही अद्याप संकट कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरें पाठोपाठ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी तर आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी कार्यक्रर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 11, 2021
मागील वर्षापासून आपण कोरोनाशी लढत आहोत, आता तिसऱ्या लाटेसाठीही आपल्याला सज्ज व्हायचे आहे. त्यामुळचे, माझ्या वाढदिवसानिमित्त यंदा कार्यक्रम, सोहळे, सत्कार मी टाळत आहे. माझ्या वाढदिवसासाठी होर्डिंग्ज, हार, केक यासाठी खर्च न करु नका. शक्य ते नियम पाळावे आणि इतरांना मदत करावी, हीच माझ्या वाढदिवसाला अमूल्य भेट आहे, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे केले आहे.
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो… माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!#महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/aCx1f4m3uW
— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2021
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भेटीसाठी घरी येऊ नये व जेथे आहात तेथे सुरक्षित राहा असे आवाहन केले आहे. समाजोपयोगी कामात राहा, त्याच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदाने स्विकारेल, असे ते म्हणाले.
Read Also :
- कोरोनारुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवली जात आहे ? आरोग्य विभाग म्हणाले…
- 12 वीच्या परीक्षांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती
- ‘वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य’
- ‘शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण आम्ही भिकारी आहोत का?’