मुंबई : कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना शासन व्हावे, यासाठी मराठा समाजातर्फे राज्यात अनेक ठिकाणी मूक मोर्चे निघाले. त्यावेळी सामना वृत्तपत्रात मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवत व्यंगचित्र छापून आले होते. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चावर उपहासात्मक टीका करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने मोठं वादंग उभं राहिलं होतं. पुसद न्यायालयाने उद्धव ठाकरे, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं होतं. त्यातच आता दुसरीकडे भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
शिवसेनेने मुक मोर्चावर टीका केल्यानंतर आता भाजपचे प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवरून टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीसह चौहोबाजूने दरेकरांवरबद्दल संताप व्यक्त केला जात असून त्यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा.@mipravindarekar pic.twitter.com/T4CDp5jvFy
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 13, 2021
‘तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा राष्ट्रवादीच्यानेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना दिला आहे. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवीन दरेकरांना, बोलण्याचे भान उरले नाही, भाजपची ही नेहमीचीच पद्धत आहे, दरेकरांना पदाचा राजीनामा द्यावा, त्यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी, अशा शब्दात नेटकऱ्यांनी सोशल माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे, दरेकर आणि भाजप यावर काय भूमिका घेणार? दरेकर महिलांची माफी मागणार का? भाजपचे पक्षश्रेष्ठी दरेकरांना समज देणार का? की या वक्तव्याच्या पाठीशी घालणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- करुणा शर्मा यांची न्यायालयात सुनावणी, आज होणार फैसला सुटणार की अडकणार?
- मृत्यू दाखल्याची कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन; सत्तारांनी ग्रामसेवकाला भरला दम
- प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू – रुपाली चाकणकर
- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली; ‘त्या’ तक्रारीत तथ्य नाही!
- महिलांची सुरक्षा कशी करणार? मुंबई पोलीस आयुक्तांनी दिल्या १० महत्त्वाच्या सूचना