मुंबई : ईडीकडून शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली गेली आहे. शिवाय, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास देखील सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, नारायण राणेंच्या अटकेच्या संदर्भातील परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यांनतर, त्यांना आता ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्याने या ‘टायमिंग’ची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिग प्रकरणाशी असलेल्या संबंधांवरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या तीन मालमत्तांवर कारवाई करण्यात आल्याचे ईडीने सांगितले असून, दुसरीकडे, शिवसेना खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित ५ मालमत्तांवरही ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे, शिवसेना नेत्यांच्या विरोधात ईडीकडून मोठी कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ईडीच्या या कारवाईनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी, तातडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी ‘सामना’च्या कार्यालयात गेले आहेत. त्यांनतर या दोघांत केवळ १० मिनिटे चर्चा झाली आणि तातडीने परब परत गेले. यावेळी त्यांनी माध्यामांना प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे, या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परब यांचा करण्यात आला ‘करेक्ट कार्यक्रम’? फडणवीसांकडून आली प्रतिक्रिया
दुसरीकडे, ईडीकडून नोटीस आल्यानंतर, “मला ईडीची नोटीस मिळाली. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. त्यामुळे नेमकी नोटीस कशासाठी आहे? हे मला सांगता येणार नाही. त्यात फक्त इन्व्हेस्टीगेशनचा उल्लेख केला आहे. या नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. या सगळ्या प्रक्रियेला मी कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रया दिली होती.
Read Also :
- दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
- “महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, हि विकृती कधीही आहे, जाणार नाही”
- पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था – नाना पटोले
- “हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखा पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही”, मलिकांचा हल्लाबोल