अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ नुकताच आता संपणार आहे. महापौर पद रिक्त होत असल्याने पुन्हा एकदा आता पालिकेत राजकीय युद्ध बघायला मिळणार आहे. अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मोठा दबदबा आहे. आमदार जगताप आणि नगर शहर शिवसेनेमध्ये मोठा राजकीय विरोध आहे. महाविकास आघाडीच्या समसमान वाटप कार्यक्रमानुसार महापौर पद शिवसेना पक्षाला जाणार आहे तर उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असे ठरले आहे. Ahmednagar Municipal Corporation Mayor Election 2021
हे पण वाचा, गोपीचंद पडळकरांचा कर्जत-जामखेड मधील थेट वावर राम शिंदेची डोकेदुखी वाढवणारा
हे पण वाचा, “अजित पवार आणि माझी भेट झाली होती मात्र…” राम शिंदे यांनी शब्द फिरवले
हे पण वाचा, साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सोमवारी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे Rohini shendage यांनी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे. ३० जून रोजी ऑनलाईन पद्धतीने महापौर पदाची निवडणूक ऑनलाईन होणार आहे. दरम्यान अर्ज भरतेवेळी महापालिकेच्या आवारामध्ये जय भवानी जय शिवाजी, महाविकास आघाडीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर सुरेखा कदम आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
हे पण वाचा, अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
हे पण वाचा, आमदार निलेश लंकेंच्या दक्षिण स्वारीमुळे दिग्ग्ज नेते हैराण; स्वकीय नेते देखील चिंतातुर अवस्थेत
महाविकास आघाडीच्या समसमान वाटप कार्यक्रमानुसार शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक पालिकेत असल्याने शिवसेनेला महापौर पद देण्याचे ठरले आहे. अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका पुष्पा बोरुडे तर अनुमोदक म्हणून नगरसेवक अनिल शिंदे यांची नावे आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे उपस्थित राहणार आहेत. महापौर पदाच्या दावेदार असणाऱ्या रोहिणी शेंडगे ह्या गेल्या २० वर्षांपासून प्रभागाचे नेतृत्व करत आहेत. अर्ज दाखल करत असताना महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.
हे पण वाचा,
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील