महानायक अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबत रात्री उशिरा माहिती दिली होती. दोघांवरीही नानावटी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
त्यानंतर आता नुकत्याच आलेल्या माहिती नुसार अमिताभ, अभिषेक यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाला आहे. दोघींनाही नानावटी रुग्णालयात नेले जाण्याची शक्यता आहे.
बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत
दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी बच्चन यांच्या निवासस्थानी ‘जलसा’ बंगल्यावर दाखल झाले. ‘जलसा’ बंगला पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आला. याशिवाय अमिताभ यांचा ‘जलसा’ आणि ‘जानकी’ बंगला दररोज सॅनिटाईज केला जाणार आहे, अशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.