राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या पाच पारनेरच्या नगरसेवकांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी केली आहे. यावरून भाजपचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले, “आपल्याच भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्यांना या ५ जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? जे एका भावाला नाही जमलं ते अजितदादांनी शब्दासाठी “करून दाखवले”!! जय महाराष्ट्र!!” दरम्यान ४ जुलैपासून राज्यातील महाविकास आघाडीला लागलेले ग्रहण आज सुटले.
आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?
जे ऐका भावाला नाही जमल ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले" !!
जय महाराष्ट्र!!
— nitesh rane (@NiteshNRane) July 8, 2020
दरम्यान, महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.