मुंबई : लोकसभेत दारूण पराभव झाल्यानंतर अजितदादांनी आता विधानसभा निवडणुक केंद्रीत केलीय. यासाठी अजित पवारांनी राज्यात आपले दौरेही सुरू केले आहेत. यातच भाजपच्या तसेच शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांना अजितदादांना महायुतीत समावून घेतल्याचे पटलं नाही. आता विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच बघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच अजित पवार गटातील १९ मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे अजित पवारांची डोकेदुखी चांगलीच वाढलीय.
हेही वाचा..अत्यंविधी करण्यासाठी चिखलातून पायपीट, कामचुकार सरकारच्या विकासथापा सर्वत्र हिट..!
मागच्या निवडणुकीत विरोधक आणि सत्ताधारी आता एकाच मतदारसंघात आल्याने उमेदवारी कुणाला मिळणार ? यावरून महायुतीत चलबिचल सुरू झालीय. महायुतीत काही विद्यमान आमदारांना मित्र पक्षातीलच नेत्यांचा विरोध असल्याने अजित पवार गटातील १९ मतदारसंघात मोठी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये दिंडोरी, कागल, वडगावशेरी, मावळ, इंदापूर, आष्टी, कोपरगाव अहेरी, अकोले, पुसद, जुन्रर, वाई हे मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.
महायुतीत मित्र पक्षाच्या नेत्यांनी विद्यमान आमदारांसमोर मोठं आव्हान उभं केलंय. यामध्ये दिंडोरीत अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले, तर कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात भाजपचे समरजीत घाटगे, चंदगडमध्ये राजेश पाटलांच्या विरोधात भाजपचे शिवाजी पाटील, मावळात सुनील शेळके यांच्याविरोधात भाजपचे बाळा भेगडे यांचा समावेश आहे.
तर इंदापूरमध्ये अजित पवार गटातील आमदार दत्ता मामा भरणे यांच्याविरोधात भाजपचे हर्षवर्धन पाटील, वडगाव शेरीत सुनील टिंगरे यांच्या विरोधात जगदीश मुळीक, तर हडपसरमध्ये अजित पवार गटातील चेतन तुपे यांच्याविरोधात महादेव बाबर यांनी आव्हान उभं केलंय. यातच आष्टीत बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात भाजपचे सुरेश धस, कोपरगावात आशुतोष काळेंच्या विरोधात भाजपचे विवेक कोल्हे आव्हान देतांना दिसताहेत.
हेही वाचा…३० वर्षांचा माढ्याचा किल्ला यावेळी ढासळणार ? शरद पवारांची ‘तुतारी’ माढ्यात वाजणार ?
अर्जूनी मोरगाव मतदारसंघात मनोहर चंद्रिकापूरे विरूद्ध भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले, अहिरीत धर्मरावबाबा आत्राम विरूद्ध भाजपचे आमदार नीलय नाईक यांनी दंड थोपाटले आहेत. अकोल्यात किरण लहामटे यांच्याविरोधात भाजपचे वैभव पिचड तर येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात भाजपच्या अमृता पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केलीय.
अमळनेरमध्ये अजित पवार गटातील अनिल पाटील यांच्याविरोधात भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी, सिंदखेड राजा मतदारसंघात अजित पवारांच्या राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर यांनी आव्हान दिलंय. जुन्नरमध्ये अजित पवार गटात असलेले अतुल बेनके यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे शरद सोनवणे तर वाईत मकरंद पाटलांच्याविरोधात भाजपच्या मदन भोसले यांनी शड्डू ठोकलाय.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंचे आता राहुल गांधी ‘ह्यदयसम्राट’ तर सोनिया गांधी ‘मॉंसाहेब’, शिंदे गटाची जळजळीत टिका
हेही वाचा…कॉंग्रेसच्या ‘या’ पाच आमदारांचा पत्ता कट ? कॉंग्रेस हायकमांडने दिले मोठे आदेश
हेही वाचा..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मनसे ९ उमेदवार देणार ; कुणाला मिळणार उमेदवारी ?
हेही वाचा…शिवाजीनगरमधून शिरोळे पुन्हा आमदार होणार ? तर आघाडीत बिघाडी निश्चित ?
हेही वाचा…जानकरांना पवारांनी दिली पक्षात मोठी जबाबदारी ? विधानसभेचं तिकीट मिळणार का ?