पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व सूत्रे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हातात दिली आहेत. बूथ बांधणी, मतदार याद्या अध्ययावत करणे यासह प्रभाग निश्चितीबाबत गव्हाणे पक्षश्रेष्ठींच्या ‘थेट कॉन्टॅक्ट’ मध्ये आहेत. त्यामुळे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विलास लांडे केवळ ‘फोटोपुरतेच’ आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे पण वाचा : राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या वादाची याचिका, हायकोर्टाने निकालात काढली; दिला अनपेक्षित निर्णय
शहरातील अजित गव्हाणे राष्ट्रवादीचा युवा दमाचा नवा चेहरा आहेत. युवा गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदार संघामध्ये संघटनात्मक बांधणीमध्ये गुपितपणे काम सुरू ठेवले आहे. २००२ पासून आतापर्यंत म्हणजे सलग ४ वेळा गव्हाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युवा नेते पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सूक्ष्म’ लक्ष घातले असून, नवोदितांच्या खांद्यावर धूरा देण्याची भूमिका ठेवली आहे.
हे पण वाचा : महाविकास आघाडीला शह देण्यासाठी ‘बिग ४’ तयार, १६ ऑगस्टपासून भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’
दुसरीकडे, माजी आमदार विलास लांडे यांनीही भोसरीच्या मैदानात ‘हालचाली’ जोरदार सुरू केल्या आहेत. वास्तविक, भोसरीत राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून लांडे यांनाच पहिली पसंती दिली जाते. पण, भाजपाला कडवा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘अजित कार्ड’ बाहेर काढण्याबाबत जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
हे पण वाचा : “राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
निवडणूक प्रभाग रचना आणि आगामी निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयात गव्हाणे आणि राज्य सरकारशी संबंधित दोन अधिकारी निवडणूक विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे सिनीअर व्यक्तींना ‘निवृत्ती’ देत नवोदितांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज आणि प्रभाग रचनेचा अभ्यास करण्यापासून माजी आमदार लांडे यांना चारहात लांब ठेवण्यात आले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हे पण वाचा : “राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
भोसरीतील गवळीनगर आणि सँडविक कॉलनी प्रभागातून अजित गव्हाणे यांनी चारवेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. सुमारे २० वर्षे राजकीय अनुभव असलेले गव्हाणे यांनी भाजपा लाटेतही आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा २०१७ मध्ये पराभव केला होता. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रोफेशनल इथिक्स असलेला चेहरा म्हणून अजित गव्हाणे यांची ओळख आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संधी मिळावी, अशी महत्त्वाकांक्षा असलेल्या अजित गव्हाणे यांच्यावर २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भोसरीची संपूर्ण जबाबदारी देण्यात येईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Read Also :
- राज्यपालांवर भाजपचा दबाव, त्यांनी स्वतःला राजकीय प्यादं म्हणून वापरून घेऊ नये!” राऊतांची खरमरीत टीका
- परमबीर सिंह यांना दोन प्रकरणात लूक आऊट नोटीस, कोणत्याही क्षणी बेड्या पडण्याची शक्यता
- मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरु आहे का? आशिष शेलारांची बोचरी टीका
- युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट
- “संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’