पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांना कडक निर्बंधासह लॉकडाऊनपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. पुणे शहरातील दैनंदिन जीवनसुद्धा आता पूर्वपदावर येत असून, महामारीची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, आज पुण्याचे पालकमंत्री तथा संपर्कमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणेकरांसाठी एक मोठी घोषणा केली असून, शहरातील निर्बंधांमध्ये आणखीन शिथिलता देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सध्या पुण्याचा बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५% आणि त्याच्या खाली आहे, यामुळे हे निर्बंध कमी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
तसेच, येत्या सोमवार पासून शहरात मॉल उघडण्याची परवानगी देण्यात आली असून, दुकानांना रात्री ७ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे, तर रेस्टॉरंट आणि हॉटेल यांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय अभ्यासिका, वाचनालय देखील सोमवारपासून सुरु होणार असून, सिनेमा, नाट्यगृह मात्र बंद राहणार आहेत. परंतु, त्यांनी यावेळी पुढचे २ दिवस बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५% च्या खाली राहिले तरच हा दिलासा दिला जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
Read Also :
- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली परमबीर सिंग यांची याचिका, नोंदवले महत्वाचे निरीक्षण
- नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
- ‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात टाळाटाळ केली तर मराठा समाजाचं नुकसान’ – चंद्रकांत पाटील
- ‘योगी-मोदी हा वाद केवळ केंद्राचे अपयश झाकण्यासाठीच’ – नवाब मलिक
- शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण