पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभेची पोटनिवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. संविधानाच्या नियमानुसार सहा महिन्याच्या आता निवडणुक घेणं अनिवार्य असल्याने ही पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप अन् महाविकास आघाडीकडून चाचपाणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा, त्याला नसबंदी…” सजंय शिरसाठ यांचा राऊतांना टोला
मला एक बातमी अशीही कळली आहे. मला वाटतं होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणुक लागणार नाही.पण बहुतेक पुण्यातील पुणे लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातली माहिती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“शिंदेंच्या सभेसाठी अधिकाऱ्यांना ५० हजार, १२ हजार, ६ हजार देण्याचे आदेश”, ठाकरे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचीची जास्त ताकद आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काॅंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघआत पोटनिवडणुक काॅंग्रेस लढवणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. यासोबतच प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे सर्व साहित्य मागवून घेतले आहेत. तसेच मतदार केंद्राची पाहणी देखील सुरू करून दिली आहे. त्यामुळे याठिकाणी आता लवकरच पोटनिवडणुक लागण्याची शक्यता सर्व स्तरातून वर्तवली जात आहे. यातच भाजपकडून या निवडणुकीसाठी स्व. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील,” भाजप आमदाराची राऊतांवर जहरी टिका
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन
हेही वाचा…“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला,
हेही वाचा…शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार ? अपात्रतेच्या कारवाईला वेगाने हालचाली
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”