मुंबई : ठाकरे सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही आता ड्रेसकोड लागू केला असून, कार्यालयात येताना जीन्स, टी-शर्ट तसेच रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेले, गडद रंगाचे कपडे घालण्यास मनाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीन्स पँटचा निर्णय चुकलाच, असे म्हटले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालून यावं, ही या मागची सरकारची भूमिक आहे. मुख्यमंत्री साहेब हे मंत्रालयात टी शर्ट घालून येत नाही. घरी असले टी शर्ट घातलं तर ठीक आहे. जिन्स पँटचं चुकीचं झालं. बघू आम्ही त्याच्यावर विचार करत आहोत, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सरकारच्या ड्रेसकोडबाबतच्या निर्णयाबाबत समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत, तसेच जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे.