पुणे : राज्य सरकारकडून अनेकदा पुण्या-मुंबईमध्ये दुजाभाव केला जात असल्याची भूमिका पुण्याचे लोकप्रतिनिधी, महापौर, व्यापारी, दुकानदार आणि स्थानिकांकडून व्यक्त केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील पक्ष कार्यालयात, राज्य सरकारशी संबंधित कामकाजासाठी निवेदने देणे, पत्रव्यवहार करणे सामान्य नागरिकांना सोयीचे जावे, म्हणून त्यांचे दोन स्वीय सहायक नेमले गेले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका – आशिष शेलार
आजपासून दर सोमवारी सकाळी ११-दुपारी २ या वेळेत हे दोन स्वीय सहाय्यक पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे पुणे महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची सत्ता आपल्या खिशात घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या रणनीतीचा देखील हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
दरम्यान, यासंदर्भात बोलताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, ‘‘पक्षाचे कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठीच नाही तर पुणेकरांसाठीही हक्काचे व्यासपीठ बनावे, अशी पालकमंत्र्यांची अपेक्षा आहे. नागरिक आणि राज्य सरकारशी संबंधित कामांचा दुवा म्हणून पक्ष कार्यालय आता काम करणार आहे. सरकारशी संबंधित कामकाजाबाबतची निवेदने, पत्रे, सार्वजनिक कामांबाबत इथे मार्गदर्शन दिले जाणार आहे”, असे सांगत, “पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा”, असे आवाहन केले आहे.
अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
Read Also :
- मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
- “लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
- मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न
- आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
- मोदी सरकार आज दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार; मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार?