मुंबई : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर, विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिन चीट; राठोड यांचं होणार पुनर्वसन?
कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्याचा निकाल ९९.९५ टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये कोकणा विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून पुणे विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९९.६५ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील २२,७६७ शाळांपैकी २२,३८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
असा बनविण्यात आला निकाल
राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल; आमदार अतुल भातखळकरांना आत्मविश्वास
नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झालेला निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
विभागिय मंडळ निहाय निकाल
पुणे : ९९.६५
नागपूर :९९.८४
औरंगाबाद :९९.९६
मुंबई :९९.९६
कोल्हापूर :९९.९२
अमरावती :९९.९८
नाशिक : ९९.९६
लातूर :९९.९६
कोकण :१००
परीक्षेसाठी बसलेले
विद्यार्थी : ९,०९,९३१
विद्यार्थिंनी : ७,४८,६९३
एकूण : १६,५८,६२४
निकाल पाहण्यासाठी लिंक : www.result.mh-ssc.ac.in
शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in
Read Also :
- पुन्हा एक झटका : अजित पवारांसह अनिल परबांची CBI चौकशी होणार, उच्च न्यायालयात याचिका दाखल
- पुण्यातील सत्ताधारी भाजपला अतिअहंकार भोवणार? विरोधकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर
- २०१६ मधील फडणवीसांच्या पराक्रमाचा अजितदादांनी काढला वचपा
- ब्राँडगेज मेट्रो प्रकल्पात बल्लारपूर व चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा – आ. सुधीर मुनगंटीवार
- शिवसेना उचलणार स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च, केली १० लाखांची मदत