पुणे – सर्व राज्याचे लक्ष असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रंगलीय. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत आहे. उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. याच मतदानानंतर अजित पवारांनी एक नेमकी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली
पुणे जिल्हा बँकेच्या मतदानानंतर अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे. बारामती येथे ७०० मते असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
अजित पवार म्हणाले की, गेली तीस वर्षांपासून आम्ही बँक चांगल्या प्रकारे करत आहोत. यावेळी लोकांनी सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे. दोन महिला, क आणि ड वर्गात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत कोणी जातीवादाचा तर कोणी पाहुणे असल्याचा आरोप केला आहे. आम्ही पाच लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना देतो. जनरल निवडणुकीत सोपे जाते. मात्र, येथे मतदार कमी असल्यामुळे ही निवडणूक जिकरीची होते. काही प्रलोभने मिळाली तर अवघड होऊन जातं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Read also:
- “एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
- “ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मी मंत्रिपदाचा त्याग करणार”
- नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
- कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत
- “१२ कोटींची मर्सडिज घेणाऱ्यांनी आता स्वतःला फकीर म्हणू नये”; संजय राऊतांचा मोदींच्या महागड्या गाडीवरून सणसणीत टोला