पर्यटन मंत्र्याचा कारभार मी उघड केला म्हणुन सरदेसाईना का दुखले असा सवालगोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
भाजपला 2017 च्या निवडणुकीत मदत करणाऱ्यांच्या मुलांनाही शाप लागेल असे भाषण ठोकणारे सरदेसाई लोकांच्या पाठीत सुरा खुपसून भाजप बरोबर सत्तेत सामील झाले हे लोक कदापी विसरणार नाहीत. आजही केंद्रात भाजपच्याच नेतृत्वाखालील एनडीएचा गोवा फॉरवर्ड पक्ष सदस्य आहे. त्यामुळेच दिल्लीवरुन श्रेष्ठींचा आदेश आल्याने बाबूंची पाठराखण करण्यास ते पुढे आले असावेत असा टोला पणजीकर यानी लगावला आहे.
काल कार्नीव्हल विजेत्यांची बक्षिसे बाबू आजगावकरानी आपल्याला काही न मिळाल्याने अडवून ठेवली आहेत असा आरोप मी केला होता व राज्यपालानी सदर विषयात लक्ष घालुन सर्व विजेत्या पथकाना त्वरित त्यांची बक्षिसांची रक्कम देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती. एरव्ही गोंयकारपणाचे नाव घेणारे व फातोर्ड्यात सत्तेचा माज दाखवीत रस्ता अडवुन कार्नीव्हल उत्सव साजरे करणाऱ्या सरदेसाई यानी माझ्या मागणीला पाठिंबा देत पर्यटन मंत्र्याचा निषेध करण्याचे सोडुन, उलट माझ्यावरच खटला दाखल करण्याचा सल्ला दिला यावरुन त्यांचे राजकीय लागेबांधे कुठे आहेत हे स्पष्ट झाले आहे,असे पणजीकर म्हणाले.