IMPIMP

पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”

पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे बाजीराव पेशव्यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी ते बोलत होते. पुण्याच्या भूमीला स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान संबोधत, शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही अभिवादन केले.

हेही वाचा…राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे भाजपमध्ये दाखल; नड्डांच्या निमंत्रणामुळे चर्चांना पूर्णविराम!

“पुण्याची भूमी स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान!”
अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले, “मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो.” पुण्याची भूमी स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान असल्याचे सांगत, १७ व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख तंजावूरपासून अटकेपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत पोहोचला, असे त्यांनी नमूद केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राच्या भूमीतून मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी याच महाराष्ट्राच्या भूमीतून उदाहरण घालून दिले. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकर यांनी दाखवले.” एनडीएच्या स्थापनेमागील दूरदृष्टीबद्दल बोलताना शाह यांनी इंग्रजांना हे माहीत नव्हते की, हे ठिकाण शतकभर भारताच्या सुरक्षेचे स्थान बनेल, असे म्हटले.

हेही वाचा…बारामतीत फडणवीसांचा ‘शह-मात’ डाव: प्रवीण माने यांच्या भाजप प्रवेशाने पवार कुटुंबियांची चिंता वाढली!

“बाजीराव पेशव्यांपासून प्रेरणा घेऊन भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही!”
बाजीराव पेशव्यांचे पुतळे देशभरात असले तरी, एनडीए हे स्मारक उभारण्यासाठी योग्य जागा असल्याचे शाह यांनी सांगितले. “श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. मला वाटतं अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युद्धाच्या पद्धतीतील साम्याविषयी बोलताना अमित शाह म्हणाले, “युद्धाचे काही नियम कालबाह्य होत नाहीत. युद्धात व्यूहरचनेचं महत्त्व, त्वरेचं महत्त्व, समर्पणाचा भाव, देशभक्तीचा भाव आणि सर्वात मोठी गोष्ट युद्धात बलिदानाचा भाव हाच सैन्याला विजय मिळवून देतो.” हत्यारे बदलत असली तरी, युद्धाच्या या कलेचा भाव बाजीराव पेशव्यांमध्ये होता, असे त्यांनी सांगितले. १९ वर्षांच्या वयात शाहू महाराजांनी त्यांची निवड कशी केली असेल, याबद्दल आश्चर्य व्यक्त करत, त्याकाळी अनेक आव्हाने होती असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा…मनसेच्या ‘मराठी’ दणक्यावर: राणे-देशपांडे आमनेसामने!

“२० वर्षांत ४१ युद्धे लढले, एकही हरले नाहीत!”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचे कौतुक करताना सांगितले, “शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांची निवड केली. त्यांनी २० वर्षांत ४१ युद्धे लढली. एकही युद्ध हरले नाहीत. हा रेकॉर्ड कोणत्याच सेनापतीचा नाही. एका वर्षात दोन युद्धे होतात. त्याकाळी पावसाळ्यात चार महिने युद्ध होत नव्हती. म्हणजे ८ महिन्यात दोन युद्धे करून जिंकले. असे वीर सेनानी होते ते.” शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना केली तेव्हाचा भारताचा भूगोल आणि साम्राज्याचा इतिहास पाहता, १२ वर्षांच्या मुलाने काय विचार केला असेल, याचा विचार करा, असे आवाहनही शाह यांनी केले.

हेही वाचा…

मुंबईत ‘ठाकरे’ एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, ‘बूट चाटण्या’चा टोला!

ठाकरे पिता-पुत्राला सरनाईकांचे जेवणाचे निमंत्रण: शिंदे गटात चर्चांना उधाण!

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राणेंचा निशाणा: ‘स्वार्थासाठीची धडपड!

हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस :आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी!

चित्रा वाघ संतापल्या, आरोपीला अटक करा! पुण्यात कुरिअर बॉयच्या वेशात येऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

Total
0
Shares
Leave a Reply
Previous Article

मुंबईत 'ठाकरे' एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, 'बूट चाटण्या'चा टोला!

Next Article

ठाकरे बंधूंच्या 'विजयी मेळाव्या'वर रामदास कदमांचा हल्लाबोल: "हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी केली, आता कशाचा जल्लोष?"

Related Posts
Total
0
Share