ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी रात्री ऐश्वर्या राय बच्चन व आराध्य बच्चनदेखील रुग्णालयात दाखल झाले आहेत.
अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी कोरोनावर मात केली असून या दोन्ही पिता-पुत्रांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याचा दावा केला जात होता मात्र हि बातमी खोटी असल्याचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.
.. this news is incorrect , irresponsible , fake and an incorrigible LIE !! https://t.co/uI2xIjMsUU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 23, 2020
बॉलिवूडचे महानायक अमिताभ आणि बच्चन कुटुंब लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी जगभरातील त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमध्ये असूनही अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन रुग्णलयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, नुकतेच अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट शेअर केली होती. स्वतःचा आणि अभिषेकचा फोटो शेअर केला होता. त्यांनी ट्विट करत सगळ्यांचे आभार मानत म्हटले की, चाहते नेहमी त्यांच्या सुख दुःखात सोबत उभे राहतात. मग आनंद असो किंवा आजारी. तुम्ही जवळचे आणि प्रिय, शुभेच्छुक, चाहते, तुम्ही सगळ्यांनी नेहमी आम्हाला प्रेम दिले. आमच्यासाठी प्रार्थना केली. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी कृतज्ञता व्यक्त करतो. या परिस्थितीत हॉस्पिटलचे प्रोटोकॉल खूप कठोर आहेत.