बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. कोरोनाव्हायरसच्या नकारात्मक चाचणीनंतर नानावटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. हि त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खुद्द अमिताभ बच्चन आयांनी आपले ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत हि माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
“आपली कोरोना चाचणी आता निगेटिव्ह अली असून मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आहे. मी घरात आता स्वतःला क्वारंटाईन केले आहे.” अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत तसेच नानावटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे आणि सर्व परिचारिकांचे देखील आभार मानले आहेत. ” नानावटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांमुळे आणि तेथील नर्सेसने घेतलेल्या काळजीमुळे मला आज हा दिवस पाह्यला मिळत आहे” असे अमित बच्चन यांनी म्हणले आहे
T 3613 – I have tested CoVid- have been discharged. I am back home in solitary quarantine.
Grace of the Almighty, blessings of Ma Babuji, prayers & duas of near & dear & friends fans EF .. and the excellent care and nursing at Nanavati made it possible for me to see this day . pic.twitter.com/76jWbN5hvM— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 2, 2020
दरम्यान, दिवसोंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे . अनेक राजकीय , क्रीडा विश्वातील मंडळी देखील या कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. मुंबईत देखील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झालेली आहे बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना आणि त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाने आपल्या जाळ्यात अडकवले होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन यांनी काही दिवसांपपूर्वीच कोरोनावर मात केली आहे. तर आता अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मात्र अभिषेक बच्चन हे अद्याप कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मी लवकरच कोरोनाला हरवून घरी येईन, असेही अभिषेक बच्चन म्हणाले.
I, Unfortunately due to some comorbidities remain Covid-19 positive and remain in hospital. Again, thank you all for your continued wishes and prayers for my family. Very humbled and indebted. 🙏🏽
I’ll beat this and come back healthier! Promise. 💪🏽— Abhishek Bachchan (@juniorbachchan) August 2, 2020