मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे, दर्ग्याचा विषय आपल्या जाहीर सभेतून मांडला. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांनी ट्विट करून डिवचलं आहे. आपल्या ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांनी असं म्हटलं आहे की, धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जून ला रायगड जाणार असं समजलं. पण हे महाशय गड चढून जाण्याची हिमंत करतील का ? असा खोचक टोला हाणला. तसेच कसं आहे, गड चढायला मावल्याचं काळीज असावं लागतं. कावळ्याची टिवटिव नव्हे. अशी शाब्दिक टिप्पणीही अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
तसेच पुढे बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, समजा हे भावी मुख्यमंत्री झालेत तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी विधीमंडळात भोंगे, हनुमान चालीसा, दर्गा यावर चर्चा ऐकायला मिळतील. मुसलमान किती वाईट असतात हे भावी मुख्यमंत्री सांगतील. असंही त्यांनी म्हटलं आहे.
धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा.. महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जुन ला “रायगड” जाणार असं समजल, पण हे महाशय गड चढुन जाण्याची हिम्मत करतील का ? कसं आहे ,गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2023
Read also
- हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
- हेही वाचा…“दरारा…! राज ठाकरेंनी फक्त मुद्दा उपस्थित केला, तिकडे प्रशासनाची धडक कारवाई
- हेही वाचा…“..तर माझ्या थोबाडातून जे बाहेर पडेल, ते तुम्हाला झेपायचं नाही”, राज ठाकरेंचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!