पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये आहेत. अजित पवार यांच्या हस्ते पोर्टेबल कोविड केअर सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि मास्टर कार्डच्या माध्यमातून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडून स्वच्छतेला देण्यात येणार महत्व यापूर्वी अनेकदा दिसून आलं आहे. कोविड केअर सेंटरच्या उभारणीसाठी अजित पवार दाखल झाल्यानंतर गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यांना कचरा दिसून आला तो त्यांनी लगेच उचलला. यामुळे अजित पवार यांच्याकडून स्वच्छतेचं महत्व पुन्हा अधोरेखित झालं आहे.
शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
बारामतीमध्ये पोर्टेबल कोविड केअर सेंटरचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि मास्टर कार्डच्या माध्यमातून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. अजित पवार यांनी यावेळी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोनाचं संकट सर्वांवर आलं, या संकटानंतर आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी द्यावी हे समजलं आहे. जुन्या काळात प्लेगची साथ आली होती त्यात अनेकजण मृत्यूमुखी पडले. कोरोना एवढा जीवघेणा ठरेल किंवा जग स्तब्ध होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.
“पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला
शरद पवार साहेबांना नैसर्गिक संकटाशी सामना करण्याचा अनुभव असून त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद दिले होते. प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे. बारामतीत अनेक संस्था नावारुपाला आल्या, बारामती आता एज्युकेशन हब झालं. मेडिकल कॉलेज झालं आणि त्यानंतर आयुर्वेद महाविद्यालयही मंजूर झालंय. आरोग्याच्या दृष्टीने अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. आजूबाजूच्या तालुक्यांनाही बारामतीतील पोर्टेबल कोव्हिड केअर सेंटरचा फायदा होईल, असं अजित पवार म्हणाले.
Read Also :
- भाजपची जन आशीर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात; मुंबई पोलिसांकडून तब्बल ३६ गुन्हे दाखल
- लायकी नसलेल्या दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये – मनसे
- २५० कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार; अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?
- पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा