मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात, तसेच १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ईडीने त्यांना चारवेळा नोटीस बजावून देखील त्यांनी, आरोग्याची आणि इतर काही कारणे देत चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. यातच आता ईडीने चौकशीसाठी देशमुखांना आणखी एक समन्स बजावले आहे. त्यानुसार, बुधवारी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.
ED च्या पाचव्या समन्सनंतरही देशमुख चौकशीसाठी गैरहजर! वकिलांनी सांगितलं कारण…
मात्र, त्यांनी ईडीच्या चौकशीला पुन्हा एकदा जाणे टाळले असून, त्यांच्या वकिलांनी ईडीच्या कार्यालयात येऊन प्रश्नांना उत्तरे दिली. “आम्ही ईडीला वाट पाहायला सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांनी थांबावं, अशा आशयाचं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू”, असं इंदरपाल सिंग यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
न्यायालयच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना ईडीचे पाचव्यांदा समन्स!
दरम्यान, ईडी आता देशमुखांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, ईडीने कारवाई करण्याआधीच देशमुखांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी कायद्याचं पालन करतो. मी जेव्हा हवं, तेव्हा ईडीला समोर जाईन. सध्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याचीही मी वाट पाहतो आहे. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.
सचिन वाझे यांच्यासोबत अनिल देशमुखांना एकाच कोठडीत राहावं लागेल – किरीट सोमय्या
तसेच, “मनी लॉड्रिंग प्रकरणात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. आमची याचिका ही त्या याचिकांशी जोडली गेली आहे. त्यामुळे या प्रकरणात सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल, तो आम्हाला मान्य असेल. पण तोवर आम्हाला समन्स पाठवलं जाऊ नये. आमच्यासाठी अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत,” असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. तसेच, आपण ऑनलाईन चौकशीला तयार असल्याचंही त्यांनी ईडीला सांगितलं आहे.
Read Also :
- “आम्हाला फक्त ब्रह्मज्ञान आणि त्यांच्याकरता कोरडे पाषाण”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ….त्यामुळेच भाजपने नेत्यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली, अब्दुल सत्तारांचा मोठा दावा
- “बाळासाहेब आज हवे होते, म्हणाले असते…” नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना
- मुंबई महापालिकेत ‘आम्हीच’ येणार! सेनेच्या होमग्राऊंडवरून राणेंचा हल्लाबोल
- “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला…”, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल