मुंबई : गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं परिवहन मंत्री अनिल परब व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज महत्त्वाची बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुमारे साडेचार तास झालेल्या या बैठकीनंतर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यामुळं संपावर लगेचच तोडगा निघण्याची शक्यता मावळली आहे.
एसटी महामंडळ कुणाच्या बापाजाद्याची जहागिरी नाही; गोपीचंद पडळकरांनी सरकारला खडेबोलं सुनावलं
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी दिवाळीच्या आधीपासून एसटी कामगार संपावर गेले आहेत. उच्च न्यायालयानं मनाई आदेश काढल्यानंतरही संप सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं समितीही स्थापन केली आहे. या समितीचा निर्णय सरकारला मान्य असेल, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, कामगारांनी समितीवरही अविश्वास दाखवला आहे. त्यामुळं संपाचा तिढा कायम आहे. सरकार विलिनीकरणाची घोषणा करत नाही तोवर मागे न हटण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. तर, सरकारनं कामगारांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे व कारवाईचा बडगाही उगारला आहे. तरीही कामगार निर्णयावर ठाम आहेत.
‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
या पार्श्वभूमीवर आज पवार व परब यांच्यात चर्चा झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती परब यांनी दिली. पवार साहेबांनी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. कामगारांच्या मागण्यांवर कोणते पर्याय असू शकतात व त्यांचे समाधान कसे होऊ शकते, न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या समितीसमोर राज्य सरकारनं काय बाजू मांडायला हवी, यावर बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. एसटीचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार आहे. मात्र, कोणताही निर्णय लगेच घेणं शक्य नाही, असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
विलिनीकरणाच्या मुद्दा हा उच्च न्यायालयासमोर आहे. त्याबाबत समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसार न्यायालय जो निर्णय देईल, तो स्वीकारला जाईल. संप लवकरात लवकर मिटावा असे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांबरोबर एसटीचंही नुकसान होत असून लोकांचेही प्रचंड हाल होत आहेत, असं अनिल परब यांनी सांगितलं.
Read Also :
- विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने विदर्भात मोठ्या नेत्याचा भाजपला रामराम..!
- कोनशिलावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याच नावं चुकलं; अजित पवारांनी चक्क डोक्यालाच हात लावला
- प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे
- ST संपाच्या तोडग्यासाठी आता पवारांचा पुढाकार; परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक
- ट्विट का जवाब ट्विटसे: मलिकांच्या ट्विटला वानखेडेंचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे फोटो टाकत सणसणीत उत्तर