मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.
रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच
गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत झालेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
राजकारण करण्यापूर्वी अभ्यास करुन बोलावे, खासदार मेंढे यांचा विरोधकांना टोला
यातच आता रायगडमध्ये या अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली असून, महाड तालुक्यातील तळई गावात ३५ घरांवर दरड कोसळून तब्बल 3६ जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे, तर सुमारे आणखीन ८०-९० लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काल संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेतील ३२ लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.
Read Also :
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी