मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर, बारमालकांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप केल्यांनतर देशमुखांच्या मागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा दिवसेंदिवस त्यांच्याभोवतीचा फास आवळत चाललेला असून, आता देशमुखांच्यावरील मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी, आज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
या आरोपपत्रात अनेक महत्वाचे पुरावे असून, सचिन वाझेचा जबाब, बार मालकांचा जबाब, देशमुखांच्या इतर बोगस कंपन्यांचे पुरावे, देशमुखांच्या संस्थांत आलेल्या गेलेल्या पैशाचे व्यवहार असे पुरावे असण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी आत्तापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली असून, अटक केलेले संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे, हे दोघे देशमुखांचे सचिव होते. त्यांना २५ जूनला अटक करण्यात आली होती.
“भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल
त्यामुळे, आता या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असून, ईडीकडून विशेष ईडी कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. दरम्यान, पालांडे आणि शिंदे आधी ईडीच्या कोठडीत होते. नंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आणि गेल्या २ महिन्यांपासून दोघेही जेलमध्ये आहेत. ईडीच्या कायद्यानुसार ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करायचा नियम आहे. त्यानुसार आता या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
छगन भुजबळ अचानक दिल्लीला रवाना; देशातील बड्या वकीलाची घेणार भेट
दरम्यान, पाच समन्सनंतरही गैरहजर राहिल्याने ईडीकडून देशमुखांविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची तयारी सुरु असून, ईडीने कारवाई करण्याआधीच देशमुखांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, “मी कायद्याचं पालन करतो. मी जेव्हा हवं, तेव्हा ईडीला समोर जाईन. सध्या न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याचीही मी वाट पाहतो आहे. माझी याचिका कोर्टाने दाखल करुन घेतली आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, देशमुखांवर अटकेची टांगती तलवार कायम असल्यासाघे दिसून येत आहे.
Read Also :
- नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना
- म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
- “सामनाचे नाव बदलून आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे,” भाजपचा घणाघात
- मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर ‘बुलडोझर’, आता पुढे परब? सोमैय्या म्हणतात, “करून दाखवले!”
- शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…